Milk rate today :- राज्यातील बहुतांश शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय निवडतात.पूर्वी त्यातून शेतकाऱ्यांना मोठा पैसा देखील मिळत होता मात्र आता पशु खाद्य व वैरणीचे दार मोठ्या प्रमाणावर वाढले मात्र दुधाचे दार अजून स्थिर आहेत.यामुळे शेतकऱ्यांना काढलेला खर्च पाहता दूध व्यवसाय परवडत नाही.

शेती व योजना मोबईल वर मिळविण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करा

दूध खरेदीचा विचार केला तर राज्यातील खासगी कंपन्या तसेच सहकारी दूध संघ हे शेतकऱ्याकडून फक्त ३० रुपये दराने खरेदी करतात.आता मात्र या खरेदीच्या दारात वाढ करून किमान ३५ रुपये लिटर दराने खरेदी करावी यासाठी सरकार आता काम करणार आहे.
दुधाचे भाव वाढण्यासाठी सरकार करणार पाठपुरावा | Milk rate today increases
दूध खरेदीचा विचार केला तर राज्यातील खासगी कंपन्या तसेच सहकारी दूध संघ हे शेतकऱ्याकडून फक्त ३० रुपये दराने खरेदी करतात.आता मात्र या खरेदीच्या दारात वाढ करून किमान ३५ रुपये लिटर दराने खरेदी करावी यासाठी सरकार आता प्रयत्न करणार आहे,अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री रामकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

पुण्यात घेण्यात आलेल्या दुग्ध संस्थेच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला निर्णय पत्रकार परिषदेत सांगितला.दूध उत्पादक शेतकऱयांकडून बऱ्याच दिवसापासून दार वाढीची मागणी करण्यात येत होती.करम मधल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर दुधाच्या दारात घाट झाल्याने शेतकऱ्यांनी हि मागणी केल्याचं सांगितलं.
कोणताही व्यवसाय करण्यामागे २ पैशाचा वाढीव नफ्याची अपेक्षा असते तेव्हा दूध संघाच्या नफ्यासोबत शेतकऱ्यांचा नफा देखील लक्षात यावा याकरिता दुधाचे दर वाढीचा सरकार पाठपुरावा करेल असे यावेळी विखे पाटील यांनी सांगितले.आता लवकरच दूध लवकरच ३५ रुपये लिटरने विक्री होण्यासाठी सरकारची ठाम भूमिका ठरणार आहे.
महाराष्ट्रातील दुध उत्पादन: वर्तमान स्थिती काय आणि आजचे दुधाचे दर | Milk rate
दुध उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र भारतात प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्राच्या 2019-20 वर्षाच्या तुलनेत 2020-21 वर्षांमध्ये दुध उत्पादन अधिक वाढले आहे. पुण्या पेक्षा नाशिक, औरंगाबाद या विभागात दुध उत्पादन कमी आहे.
महाराष्ट्रातील सहकारी आणि सरकारी दुध उत्पादकांच्या दैनंदिन दुध प्रमाण कमी होत आहेत. 2020-21 वर्षातील एकूण दुध उत्पादन महाराष्ट्रात 137.03 लाख मेट्रिक टन एव्हढे उत्पादन घेतेले,तर 2019-20 वर्षांमध्ये 120.24 लाख मेट्रिक टन दुध उत्पन्न झाले होते.आर्थिक सर्वेक्षण 2022-२३ च्या अहवालानुसार हि माहित समोर आली आहे.

पशुखाद्य व वैरण योजना –शेतकऱ्यांना मिळणार 60 हजार रू.अनुदान
योजनेसाठी इथे क्लिक करा.
अहवालाच्या माहिती प्रमाणे महाराष्ट्राने आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेशप्रमाणे अधिक दुध उत्पादन केले आहे. अशाप्रमाणे, 2020-21 सालात पुण्याने 62.41 लाख मेट्रिक टन दुध उत्पन्न केला.
नाशिकाने 36.68 लाख मेट्रिक टन आणि औरंगाबादाने 20.86 लाख मेट्रिक टन दुध उत्पन्न केला. अमरावतीने 6.51 लाख मेट्रिक टन, नागपुराने 5.93 लाख मेट्रिक टन आणि कोकणाने 4.64 लाख मेट्रिक टन दुध उत्पन्न केला.”
Users Today : 2
Users Yesterday : 7
Users This Month : 112
Total Users : 24965
Views Today : 2
Total views : 41223
Who's Online : 0