Ration Card anudan :- शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करत असताना पुन्हा एक मोठी अडचण शेतकऱ्यासमोर उभं आहे ते म्हणजे शेतकऱ्यांचा मला बंद करून त्यांना थेट बँक खात्यात मिळणार अनुदान.शेतकरी मित्रानो तुम्हाला तर माहीतच आहे गेल्या काही महिन्यापासून शेतकऱ्यांना shendari ration card च्या माध्यमातून माल मिळणे बंद झाले आहे.
Ration Card anudan
मागे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांना आता धन्या ऐवजी थेट पैशाचे अनुदान दिले जाणार असा निर्णय घेण्यात आला होता.त्यासाठी काही अर्ज प्रक्रिया शेतकऱ्यांना सांगितल्या ते अर्ज शेतकऱ्यांनी भरून तहसील कार्यालयात दिले या नंतर देखील अजून पर्यंत कोणत्याच शेतकऱ्याला अनुदानाचा लाभ मिळाला नाही .हि योजना फक्त कागदावरच राहील असे आता शेतकऱ्यांनाच मत येत आहे.
शेतकऱ्यांना किती धान्य मिळते? दर काय?
अगोदर वेगवेगळ्या रेशन कार्डाचा लाभ शेतकऱ्याना धान्याच्या स्वरूपात होता .शेतकऱ्याना तसेच इतर नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून थेट धान्य दिले जात होते.त्यानंतर शेतकऱ्याना प्राधान्य गटामध्ये समाविष्ट करून त्यांना २५ किलो असे धान्य देण्यात येऊ लागले.
हे धान्य त्यांना २ रुपये किलो गहू व ३ रुपये किलो तांदूळ या दराने मिळू लागला.अंतोदय रेषेत धारकांना याच दराने ३५ किलो माल दिला जातो.इतरांना देखील अशाच प्रकारे दर लागू होते. मात्र अंतोदय व APL ,BPL व प्राधान्य गट यांना वेगवेगळे किलोचे प्रमाण मिळतात.
मागील काही दिवसा पासून मात्र शेतकऱ्यांना मिळणारे धान्य बंद करून प्रति व्यक्ती १५० रुपयांची घोषणा करण्यात आली व लवकरच तुमच्या खात्यात हे अनुदान येणारच सांगितलं.१ जानेवारी २०२३ ला या अनुदानाचा मुहूर्त देखील ठरला होता मात्र कोणत्याच शेतकऱ्यांना मिळणार अनुदान तर मिळालं नाही सोबतच त्यांना मिळणार धान्य देखील बंद झाल्याने आता शेतकरी वर्ग नाराजी व्यक्त करत आहे.
हि शेतकऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे.सरकार नुसती योजनेची घोषणा करतो मात्र प्रत्यक्ष मात्र त्याची अंमलबजावणी करत नाही.यामुळे आता शेतकऱ्यांना किराणा दुकानातून धान्य खरेदी करावे लागत आहे.संबंधित विभागाशी विचारणा केली असता योजना सुरु करण्यासाठी गतीने काम सुरु असल्याचं सांगितलं जात आहे.
मात्र हि गती कासवाची आहे असे शेतकरी वर्ग म्हणत आहे.बऱ्याचं शेतकऱ्याची माहिती जमा करणे बाकी आहे.काही जिल्ह्याची माहिती पूर्ण जमा झाली मात्र अजून देखील त्यांना अनुदान मिळालं नाही.
धान्य मिळत नसल्यास लगेच हे काम करा.
बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत कि ते शेतकरी गटात नाहीत मात्र त्यांना देखील दुकानदाराच्या माध्यमातून धान्य दिले जात नाही.पुरवठा निकक्षक यांना विचारणा केली असता ज्या शेतकऱ्यांचे ration card aadhar link नसल्या कारणाने त्यांचे फिंगर प्रिंट येत नाही व त्यांचे धान्याचे ट्रॅनजेकशन होत नाही .जर असे काही शेतकरी असतील तर लवकरात लवकर आपले adhar card रेशन सोबत लिंक करून घ्यावे त्यांचा माल सुरु होईल.
तुम्ही खरेदी केलेले खत बोगस तर नाही ना ?- कृषी विभागाने केले Bogus fertilzer जप्त.
Bogus fertilzer:-शेतकरी आता मोट्या प्रमाणावर संकटात सापडला आहे. पहिलेच वेळेत पाऊस पडत नसल्यास तो हवालदिल झाला असून नावं संकट त्याच्यापुढे आले आहे.शेतकऱ्यांना आता पेरणी करायची आहे, त्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर खताची आवश्यकता लागणार आहे मात्र जर तुम्ही खात खरेदी करण्यासाठी बाजारात जात असाल तर सावधान !
Bogus fertilzer
कारण आता बाजारात बोगस बनावटी खत विक्री सुरु आहे.तुम्हाला विस्वास बसत नसेल मात्र हे अगदी खरं आहे कारण जालना जिल्ह्यात हा प्रकार उघडकीस आला आहे.बातमी अशी कि,घनसावनगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील नामांकित कंपनीमधून हजारो खाताच्या बोगस बनावटी खतावर छापा टाकला आहे.
कृषी विभागाच्या पथकाने पुणे,छत्रपती संभाजी नगर व जालना या तीन ठिकाणी काही कृषी केंद्रावर सोमवारी दिनांक १९/०६/२०२३ रोजी छापा टाकून मोठी कार्यवाही केली आहे. हाती आलेल्या माहिती नुसार कृषी विभागाच्या पथकाने गुपित माहितीच्या आधारे वरील तीन जिल्ह्यामध्ये दुपार पासून कार्यवाहीला सुरुवात केली असता दिवसभर व उशिरा रात्री पर्यंत हि कार्यवाही चालली.
यामध्ये पथकाने नामांकित कंपनीच्या ५ हजाराहून खताच्या रिकाम्या गोण्या व मोठ्या प्रमाणावर बनावटी खताचा साठा जप्त केला .गुपित माहिती मिळाल्या नंतर कृषी विभागाने तीर्थपुरी येथील नामांकित कंपनीच्या खताच्या बॅगची विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळाली असता तिन्ही कृषी विभागाच्या पथकाने संयुक्त एका कृषी केंद्रावर धाड टाकली.
सूत्राने दिलेली माहिती खरी निघाल्या नंतर मात्र आणखी कसून चाकाशी केल्या गेली. यामध्ये रिकाम्या बॅग व बनावटी खत असल्यास समोर आलं.ह्या रिकाम्या खातांच्या बॅगा नामांकित खताच्या असल्या तरी यामध्ये बोगस खत विक्री होत असल्याने एकाच खळबळ उडाली.
मागील वर्षी देखील कृषी विभागया मोठ्या कार्यवाही नंतर हजारो टन बोगस खात साठा जप्त केला होता.अशा घटना वारंवार घडत असल्याने शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. शेतकरी शेतामध्ये मोठा प्रमाणावर राबतात मात्र त्याच्या उत्पनात कवडीचीही वाढ होत नाही आहे या सर्व गोष्टीला हे बोगस खात तर जबाबदार नाही ना? असा प्रश्न देखील समोर येत आहे.
या शेतकऱ्याच्या खात्यात येणार 22,000 हजार रुपये -पहा तारीख ठरली
Ativrushti Anudan:-शेतकरी मित्रानो,आता पर्यंत शेतकरी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होती ती वेळ आलेली आहे.कारण आता तुमच्या खात्यात तुमची अतिवृष्टी अनुदाना ची रक्कम मिळणार आहे.हि महत्वाची अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.मागील मंत्रिमंडळाच्य बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकऱ्याना पीकविमा (crop insurance ) मिळत असतो मात्र सरकारच्या माध्यमातून मागे झालेल्या अतिवृष्टीची मदत देण्यात येणार आहे …हि अपडेट अतिशय महत्वाची तुमच्यासाठी आहे.तुम्हाला माहीतच असेल सततचा पाऊस,अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्याच्या शेत पिकांचं मोट्या प्रमाणावर नुकसान झालं होत.
Ativrushti Anudan
त्यामुळे राज्य शासनामार्फत नवीन आपत्ती घोषित करुन मदत देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.त्याप्रमाणे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानी करिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने शेतकऱ्याना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.हि मदत कोणत्या शेतकऱ्याना मिळणार?किती मदत मिळणार?हि मदत कधी मिळणार या बाबतची सविस्तर माहित आज आपण पाहूया .
शेतकऱ्यांना किती मदत मिळणार ? किती रक्कम मंजूर झाली पहा सविस्तर
आता शेतकऱ्यांना घोषणा केल्या प्रमाणे १५०० कोटी एव्हढी रक्कम वितरणास सुरुवात झाली आहे. आनंदाची बातमी अशी कि आता शेतकऱ्याना केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर सुधारित केले आहेत. त्यानुसार आता वेगवेगळ्या जमिनी निहाय म्हणजेच जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टर 8500 रुपये मिळणार आहे.
तर ज्या शेतकऱ्याकडे बागायत क्षेत्र आहे त्यांच्यासाठी पिकांच्या नुकसानीसाठी 17 हजार रुपये प्रति हेक्टर अशी मदत दिली जाणार आहे. आणि ज्या शेतकऱ्याकडे फळपिके आहेत त्यांना मात्र जास्त नुकसान भरपाई दिली जाणार आहे.या बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 22500 रुपये प्रति हेक्टर एव्हढी मदत देण्यात येणार आहे.
आता शेतकऱ्यांचा प्रश्न आहे कि आमच्याकडे १० एकर क्षेत्र आहे तर आम्हाला किती मदत मिळेल.तेव्हा तुम्ही लक्षात घ्यावे कि हि मदत किंवा फक्त 2 हेक्टरच्या मर्यादेत ही मदत देण्यात येईल.शेतकऱ्याचे शासनाच्या माध्यमातून पंचनामे करण्यात आले होते आणि या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी आता 5 जून रोजी शासनाने 22 कोटी 80 लाख 4 हजार रुपये नुकसान भरपाई मंजूर केली आहे.
पहिले दर काय ? काय आहेत आताचे सुधारित दर.
बऱ्याच वेळी अतिवृष्टी व इतर कारणाने मोठा प्रमाणावर नुकसान होत असते.मात्र मिळणारी मदत हि फारच कमी असते.त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकर्याना अपेक्षित मदत मिळत नाही .
आता मात्र मिळणाऱ्या अनुदानात मोठा बदल करण्यात आला असून .पहिल्या दरामध्ये वाढ करत दारसुधारणा करण्यात आली आहे. पहिले दार किती होते व आताचे दारात काय सुधारणा झाली हे खालील तक्त्याच्या माध्यमातून समजून येईल.
शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. चला तर शेतकरी मित्रानो पाहूया आजचा हवामान अंदाज.येत्या 72 तासात मान्सून महाराष्ट्र व्यापणार अशी महत्वाची monsoon update आताच हाती आली आहे.हवामान विभागाकडून पावसाबाबत Havaman अंदाज विषयी महत्त्वाची माहिती अशी कि आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे व लवकरच मान्सून महाराष्ट्र व्यापणार अशी हवामान विभागाकडून पावसाबाबत महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे.
पुढील 72 तास मान्सूनच्या वाटचालीसाठी महत्त्वाचे असणार आहेत.पुढील 72 तासात मान्सून उर्वरित महाराष्ट्र व्यापण्यार का ? चक्रीवादळाचा मोठा फटका हा महाराष्ट्राला बसणार का? मॉन्सून सध्या आहे तरी कुठे ? मान्सूनच्या वाटचालीला बिपरजॉय चक्रीवादक अडथळा आहे का? चला तर पाहूया सविस्तर.तेव्हा हवामान अंदाज विषयक संपूर्ण माहिती घेण्यासाठी लेख शेवटपर्यंत नक्की वाचा..
बिपरजॉय या चक्रीवादळाने मॉन्सून बाष्प ओढले का? panjab dakh हवामानाचा च काय झालं ? | monsoon update
आज दिनांक 19 जून 2023 बिपरजॉय या चक्रीवादळाने चांगलाच कहर केला आहे.आणि सध्या त्या चाकरी वादळाची बरीच चर्चा सुरु आहे.खालील फोटोमध्ये त्याचा रस्ता दाखवला आहे. या चक्रीवादळाने मान्सूनला सुरुवातीला केरळात व नंतर दक्षिण कोकणात आणण्यास मदत केली होती मात्र हवामान अभ्यासकpanjab dakh यांच्या मते या चक्रीवादळाने मात्र मॉन्सूनला अडथळा आणला आहे.पंजाबराव डंख हे खूप प्रचलित हवामान अभ्यासक असून ते थेट लाईव्ह हवामान अंदाज देतात.तुम्हाला त्यांचे हवामान अंदाज आवडतात का नक्की सांगा.
पण हवामान विभाग मात्र त्याचा मान्सूनवर काहीच परिणाम नव्हता असे सांगत आहेत.सोबतच काही लोकांनी चक्रीवादळाच्या नावाचा वापर करून मान्सून लेट झाला असे सांगितले आहे.तुम्हाला काय वाटते हे हार आहे काय? हे चक्रीवादळ मान्सूनची आद्रता ओढत आहे या मुद्यावरून वाद सुरु आहे.आणि या कारणाने मात्र शेतकरी मोठ्या अडचणीत आलेले आहेत.
15 जून च्या इमेज मध्ये क्लिअर दिसतय की मान्सून व चक्रीवादळात खूप मोठे अंतर होते त्यामुळे तो मान्सून पाऊस वेगळा आहे.त्याने मॉन्सूनची आद्रता अजिबात ओढली नाही. त्यांनी जर मान्सूनची आद्रता ओढली असती तर सर्व हिरवा रंग तिकडे जायला पाहिजे होता असा हवामान विभाग सांगत आहे.असे झाले असते तर मान्सून जास्त वेगाने गुजरातपर्यंत गेला असता पण तसं होता मान्सून कोकणातच अडकला होता.
पाऊस कधी होणार -पावसाच्या तारखा काय ? शेतकरी म्हणतो “barish kab hogi “
या हवामानाचा अंदाज घेऊन बऱ्याचं शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या आहेत आता मात्र प्रत्येक शेतकरी “barish kab hogi ” हाच प्रश विचारत आहेत.आता मात्र शेतकर्याची चिंता मिटणार आहे.या आठवड्यात महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल होणार आहे जे तुम्हाला खालील चित्रामध्ये दिसत असेल.यामध्ये 24 जूनला काय स्थिती राहील हे तुम्ही पाही शकता.इथे तुम्ही पाहू शकता हिरवा रंग हा संपूर्ण महाराष्ट्राकडे सरकला आहे.
यावरून आता मान्सून सक्रिय होत आहे असे दिसत आहे.23 जून पासून मान्सून कोकणातून पुढे सरकण्याची मोठी शक्यता आहे व 25 जून च्या आसपास मुंबईत दाखल देखील होऊ शकतो.21 जून पर्यंत विदर्भ तसेच मराठवाडा मध्य महाराष्ट्रात,खानदेश हवामानात जास्त काही बदल होणार नाहीत मात्र 22 जून पासून हवामान अंदाज विदर्भ, कोकण, मध्य प्रदेश व तेलंगणाचा महाराष्ट्र लगतचा भाग यामध्ये ढगांची गर्दी होईल व त्याने तापमानात मोठी घाट होईल.
या भागामध्ये 25 तारखेपर्यंत बहुतांश ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची शक्यता असू शकते.ज्यामध्ये विदर्भ,पूर्व विदर्भात तसेच कोकण मध्य प्रदेश व तेलंगणाचा महाराष्ट्र लगतचा भाग याचा समावेश आहे. मराठवाडा व खानदेशातहि तापमानात घट मोठी होईल आणि 24 तारखेपासून पासून तापमान कमी होईल.
मॉन्सूनचा पाऊस पडणार कि मॉन्सूनपूर्व पाऊस ? जास्त पाऊस कुठे पडणार ?
मॉन्सून सक्रिय झाला असला तरी सर्वत्र तो अजून पोहचला नाही. काही ठिकाणी पूर्व मोसमी पाऊस सुद्धा होऊ शकतो.मध्य महाराष्ट्र व पुण्याकडील भागात 24 नंतर वातावरणातखालील प्रमाणे बदल होतील.जे या इमेज मध्ये तुम्हाला पाहता येतील.25 जून पर्यंत राहिलेल्या विदर्भात तसेच प्रामुख्याने पूर्व विदर्भात सोबतचा भाग म्हणजे मध्य प्रदेश व तेलंगाना यामध्ये पावसाचे प्रमाण जास्त राहू शकते.
मराठवाडा,खानदेश तसेच मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये विदर्भाच्या पेक्षा पावसाचे प्रमाण कमी राहील. २५ तारखेनंतर त्यात वाढीची शक्यता असू शकते.सध्याच्या मॉन्सूनच्या स्थितीनुसार 25 जून नंतर बहुतांश भागात मान्सूनचा पाऊस काही ठिकाणी कमी कुठे जास्त प्रमाणात होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
पेरण्या कधी कार्याव्या पाऊस वेळेत येईल काय?
खरं पाहिलं तर हा निव्वळ अंदाज असतो आणि तो हवेचा दाब व दिशा तसेच हिर्याच्या वेगावर प्रभावित होत असतो.याच कारणाने सक्रिय झालेला मॉन्सून यावर मोठा परिणाम झाला होता .आता मात्र सर्व परिस्थिती योग्य दिसत असल्याने मॉन्सून चांगले प्रगती करेल मात्र विदर्भातील शेतकऱ्यांना रिस्क घेण्याची तयारी असल्यास कापसाची कोरड्यात धूळ पेरणी करण्यास करता येईल.
मराठवाडा खानदेशात पाऊस थोडं लेट होऊ शकतो त्यामुळे येथील शेतकऱ्यानी जास्त गडबड करू नाही मात्र तुमच्याकडे पाण्याची उपलब्दता असल्यास तुम्ही कापसाची लागवड करू शकता.कारण आता ढगाळ वातावरण व तापमानात घट होणार आहे. मात्र संपून पेरणीची घाई शेतकऱ्यानी करू नाही.पंजाब डंख यांनी देखील सांगितले आहे कि,एक वित्त खोलीपर्यंत पावसाचे पाणी जाईपर्यंत पेनी करू नाही.
एकरी ५१ क्विंटल उत्पन्न घेण्यासाठी Amrut Pattern cotton लागवड तंत्रज्ञान संपूर्ण माहिती
Amrut Pattern cotton लागवड पद्धत देते एकरी ३० क्विंटलची सहज हमी. शेतकरी मित्रानो, तुम्हाला कुणी विचारलं कि तुम्ही कापसाचे एकरी किती उत्पन्न घेता तर तुमचं उत्तर असेल ४ ते ५ क्विंटल.काही शेतकरी १० ते १५ क्विंटल पर्यंत एकरी उत्पन्न घेतात मात्र एकरी ५० क्विंटल उत्पन्न घेणारा एक शेतकरी आहे असे म्हणलं तर मात्र तुमचा विस्वास बसणार नाही.हो शेतकरी मित्राणो असा एक शेतकरी आहे आणि खरचं ५० क्विंटल उत्पन्न त्यांनी घेतलं आहे.हे सर्व फक्त Amrut Pattern cotton पद्धतीमध्येच शक्य आहे.
चला तर शेतकरी मित्रानो आपलं देखील उत्पन्न आता ५ ते १० क्विंटलहून वाढून ३० क्विंटल पर्यंत नेऊया .आज आपण या शेतकऱ्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.त्यांच्या लागवड तंत्राबद्दल जाणून घेणार आहोत.हा शेतकरी कुठला आहे?त्यांचं तंत्र काय?त्यांची लागवड पद्धत कशी आहे? हि संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तेव्हा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
Amrut Pattern cotton :-भारतातील सर्वात जास्त उत्पन्न देणारी हि लागवड पद्धत असून, हि पद्धत अंबोडा गावातील महागाव तालुका असणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील अमृतराव देशमुख यांनी विकसित केली आहे.सुरुवातीपासूनच अमृतराव देशमुख( amrut deshmukh ) यांना शेतीची मोठी आवड होती. मात्र वडिलांनी शेतीची जबाबदारी खांद्यावर टाकली तेव्हापासून त्यांनी आपल्या शेतीमध्ये विविध प्रयोग करायला सुरुवात केली.असा करत असताना पट्टा पद्धत म्हणजेच जोडओळ पद्धत फायद्याची वाटली.
कारण त्यांनी अगोदर सूर्यप्रकाश आणि हवा यावर खूप अभ्यास करून त्याच्या लक्षात आलं होत कि पिकांना जेव्हढा सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहात तेव्हढं उत्पन्न वाढत आहे.त्यामुळे पिकाचे उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांनी पट्टा पद्धतीचा अवलंब केला आता हळू हळू त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ लागली .त्यांची शेती पाहण्यासाठी अंबोडा गावात शेतकऱ्यांची गर्दी वाढू लागली.पाहता पाहता त्यांचे एकरी उत्पन्न ३० क्विंटलवर पोहचले.
एव्हढे जास्त उत्पन्न त्यांना घेण्यासाठी त्यांना खूपच कमी खर्च येत होता.मात्र सर्वसामान्य लोकांना खर्च जास्त आणि उतपन्न कमी होत होत त्यामुळे लोकांना त्यांची पद्धत जास्तीच फायदेशीर वाटली आणि भेट देणार्या शेतकऱयांनी या पद्धतीला अमृत देशमुख यांचंच नाव देऊन अमृत पॅटर्न पद्धत उदयास आली.आता पर्यंत हजारो शेतकऱ्यांनी अमृत पॅटर्न चा अवलंब केला असून त्यांच्या उत्पन्नात दुपटीची वाढ झाली आहे.
चला तर शेतकरी मित्रानो आपण आता अमृत पॅटर्न चे पूर्वमशागत पासून तर काढणी पर्यंतचे पूर्ण मार्गदर्शन करणार आहोत.हे खालील मुद्याच्या आधारे आपण समजून घेऊया.
अमृत पॅटर्न जमिनीची पूर्व मशागत व्यवस्थापन
नांगरणी
पूर्वी जमिनीची मशागत बैलाच्या साहायाने नगर वापरून करत होत होती.मात्र जमीनीची मशागत करण्यासाठी आज शेतकरी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहे.हि पूर्वमशागत कधी करावी हेच शेतकर्याना काळात नाही.कारण ट्रॅक्टरच्या सहाय्याने बरेचसे शेतकरी ऐन पेरणीच्या वेळेस नांगरणी करतात.हे चुकीचे आहे.
जमीनीची मशागत खरीप / रब्बी पिकाची काढणी पूर्ण झाल्यानंतर लगेच करावी.त्यामुळे जमिनी चांगल्या तापल्या जावून जमिनीत असलेले शत्रु कीडींचा होते .त्याचबरोबर हानिकारक बुरशीचा नाश होईल.यामुळे किडींचे एकात्मीक नियंत्रन देखील करता येईल. ट्रॅक्टरच्या सहाय्याने जमिनीची पूर्व मशागत हि तीन फाळी नांगराच्या साहाय्याने करावी. बरेचसे शेतकरी ट्रॅक्टरनेच आरे पाडून नांगरणी करतात. त्यामुळे जमिनीची लेवल बिघडते. शेतात काही ठिकाणी नाल्या पडून बांध तयार होतात.
त्यामुळे कापुस उत्पादनात ३ ते ४ क्विंटल घट येते. म्हणुन जमिनीची मशागत ट्रॅक्टरने करीत असतांना तीन फाळी पलटी नांगराचे साहाय्याने मशागत करावी.किंवा जमिनीची लेव्हल बिघडल्यास रोटरने लेव्हल करून घ्यावी. जमीन चिबाडी असल्यास किंवा जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होत नसल्यास जमीनीमध्ये रोटाविटरच्या सहायाने मशागत करावी. यामुळे जमीन भुसभुशीत होता.व पेरणीला/लागवडीला सोपे जाते.
वखरणी
नांगरणी केल्यानंतर जमीन चांगली तापू द्यावी व त्या नंतर एकदा वखरणी करून घ्यावी.त्यानंतर पेरणीपुर्वी एकदा जमिनीची चांगली वखरणी करावी.हि वखरणी केल्यास जमिनीतून निघत असलेले टॅन मारते.सोबतच २० % तणांचा प्रार्दुभाव कमी होतो. तसेच जमीन भुसभुशीत होते.
जमीनीची मशागत करण्याबरोबर जमीनीचे सपाटीकरण करणे गरजेचे आहे. जमीनीमध्ये अधिक प्रमाणात चढ उतार असल्यास पाणि जास्त प्रमाणात झाल्यास पाणी वेगाने वाहून जाते. तसेच सोबत वरची सुपीक माती सुध्दा वाहून जाते. त्यामुळे जमीनीमधील सुपीकता कमी होते. पाणी देण्यास अडचण होते. जमिनीचे सपाटीकरण करणे अतिषय महत्वाचे असते.तेव्हा हे देखील काम करून घ्यावे.
लागवडी पूर्व शेणखताचा वापर (नियोजन)
अमृतराव देशमुख यांच्या मते शेतकरी मित्र आता मोठ्या प्रमाणावर रासायनिक खातांचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहे. शेतकऱयांनी जर या वर्षी शेतात ४ बॅग रासायनिक खत दिले तर दुसऱ्या वर्षी ६ बॅग टाकावे लागतील आणि नंतर तेवढेच उत्पादन घेण्याकरीता तिसऱ्या वर्षी ८ बॅग रासायनिक खताचा उपयोग करावा लागेल.अशा रासायनिक खतांच्या वापरामुळे कालांतराने आपली शेती पिकणार नाही तर शेती बंजर होईल/नापीक होईल.
रासायनिक खतांच्या अतिवापराने शेतातील जिवाणु नष्ठ होत आहेत. परिणामी उत्पन्नात मोठी घाट होते.त्यामुळे शेतीतील उत्पन्न वाढवायचे असेल तर शेतामध्ये सेंद्रिय खताचा वापर करावा लागणार आहे.जर तुम्हाला आपल्या शेतीमध्ये ३० क्विंटल उत्पादन घ्यायचे असेल तर एक एकर जमीनीमध्ये ८ बैलगाड्या किंवा दोन ट्रॉली शेणखत टाकणे आवश्यक आहे.असे खताचे व्यवस्थापन केल्यास हे शक्य होईल.
शेणखत तयार करण्याची सोपी पध्दत
शेणखत हे आपल्या जमिनींसाठी खूप महत्वाचं आहे,शेणखत हे खत नसून जण=मिनिट असलेल्या आवश्यक जिवाणूंचे खाद्य आहे. म्हणून रासायनिक खत व्यवस्थापण सुर्यप्रकाश / पाणी व्यवस्थापण जेवढे महत्वाचे आहे तेवढेच शेणखताची प्रक्रिया सुध्दा महत्वाची आहे.अमृतराव देशमुख यांनी शेणखतामध्ये पण बरेच प्रयोग केलेले आहे. इतर प्रयोगापेक्षा हा प्रयोग कमी मेहनतीचा असून जिवाणूंची संख्या या पध्दतीमध्ये भरपुर प्रमाणात वाढते. शेतकरी शेणखत शेतात नेवून टाकत असतात. तेव्हा आपण ते शेणखत पाहीले तर ओल्या चिखला प्रमाणे तसेच थापीच्या थापी निघतात.
त्या शेणखतात भरपुर प्रमाणात उष्णता असते. ही शेणखत गरम असल्यामुळे त्या शेणखतामध्ये जिवाणूंची संख्या वाढणार नाही. आपण पाहीले तर उकंडयाच्या वरच्या बाजुस मोकळया जागेवरील शेणखत चहा पत्ती सारखे मोकळे दिसते. कारण त्या शेणखतामध्ये जिवाणूंची संख्या भरपुर वाढलेली असते. त्यामुळे उष्ण असलेल्या उकंडयात जिवाणूंची संख्या वाढणार नाही आपणांस व या शेणखतास जिवाणूंची संख्या वाढवायची असल्यास ते शेणखत मार्च ते एप्रिल महिन्यात उपसून ज्या शेतात आपल्याला कापसाची लागवड करावयाची आहे. त्या शेतात झाडाच्या सावलीखाली १० बाय १५ चा ‘ढिग करावा.
शेतात झाडाची सावली नसेल तर त्यावर पोत्याच्या साह्याने चांगले झाकून ठेवावे.किंवा नेटची बांधणी करून तुम्ही सावली तयार करू शकता जेणेकरून ते खत थंड राहील व त्यातील उष्णता निघून जाईल.व शेण खतातील उष्णता आपल्याला काढून टाकायची आहे त्यासाठी त्या शेणखतावर भरपूर पाणी टाकायचे आहे आणि पूर्ण खत थंड झाल्यानंतर आता समोर आपल्याला काही काम करायचं आहे ते म्हणजे आता आपल्याला शेणखताची प्रक्रिया करायची आहे.
त्यामध्ये अझीटोबॅक्टर ४ किलो अधिक PSB ४ किलो अधिक ट्रायकोडर्मा ४ किलो हे जिवाणूखाते व बुरशीनाशके ५० लिटर पाण्यात चांगल्या प्रकारे मिश्रण करून टाकलेल्या शेणखतावर शिंपडून द्यावे व मग त्या खताला पोत्याच्या किंवा शेतात असलेल्या कुटाराच्या साह्याने झाकून ठेवावे .आणि ४ ते ५ दिवसाने त्यावर पाणी टाकत राहावे. ते शेणखत ओले राहील यांची काळजी घ्यावी .आता ते चांगल्या प्रकारचे कुजलेले खत तयार होईल.
अमृत पॅटर्न मध्ये कोणत्या कापूस वाणाची निवड करावी | cotton seeds
कापूस पीक घ्यायचे असेल तर मात्र वाणाची निवड हि खूप विचार पूर्वक करावी लागते.तेव्हा कापसाची वाण निवडताना तो वाण आपल्या जमिनीच्या व कालावधीच्या हिशोभाने निवडावे.म्हणजेच भारी जमीन असल्यास तसेच पाण्याची उपलब्धता असल्यास उशिरा येणारे वाण निवडावे व माध्यम जमीन किंवा कोरडवाहू असल्यास तोंडही लवकर जाणारे वाण निवडावे.
कापूस लागवड करत असताना वेळ हि देखील खूपच महत्वाचे ठरते.खार पाहिलं तर पाण्याची उपलब्धता असेल तर २० मी ते १ जून दरम्यान कापूस लागवड करावी .या कालावधीच्या पिकांना जास्त उत्पन्न मिळते आणि जर कोरडवाहू किंवा मध्यम जमीन असेल तर १ जून ते २५ जून पर्यंत लागवड व्हायला पाहिजे . वाण निवडत असताना काही विशेषता वाणात असाव्या.
१) वाण लांब धाग्याचे असावे. त्याला बाजार भाव चीनला लागतो. २) वाण हवामानातील बदलास सहनशील असावे. ३) किडी व रोगास बाली पडणारे वाण नसावे. ४) बागायती जमिनींसाठीचे वाण पुनरबहार घेण्यायोग्य असावे ५) वाणाचे बॉण्ड मोठे असावे. ६) वेचणीस सोपे असावे.
अमृत पॅटर्न ची लागवड पध्दत
अमृत पॅटर्न चे उत्पन्न वाढीसाठी काही मुद्दे खूपच महत्वाचे आहे.आणि याच आधार हि पद्धत एव्हढे जास्त उत्पन्न देऊ शकते.सूर्यप्रकाश, खेळती हवा आणि योग्य पिक पोषण या तीन गोष्टी कोणत्याही पिकासाठी महत्वाच्या असतात. यापैकी सुर्यप्रकाश आणि हवा नैसर्गीक घटक प्रत्येकाकडे सहजच उपलब्धआहेत.मात्र ते भरपुर प्रमाणात पिकांना कसे मिळतील यावर शेतकऱ्यांना जास्त काम करायचं आहे.असे केल्यास त्याचा उत्पादनावर चांगला परिणाम दिसून येतो.यासाठी पिकाची लागवड करतांना दक्षता घ्यावी लागते.
पिक पेरणी करतांना किंवा लागवड करतांना पिकाच्या दोन ओळीत योग्य अंतर ठेवायचे आहे ज्यामुळे पुढे पिकाला जास्त प्रमाणात सुर्यप्रकाश आणि हवा मिळेल. हे अंतर कीती असावे आणि अंतर असून एकरी झाडांची संख्या अधिक असावी. यावर अमृतराव देशमुख यांनी अनेक वर्षापासून प्रयोग केलेले आहेत .गेल्या ४ वर्षापासून कापुस लागवडीमध्ये त्यांनी पट्टा पध्दतीचा (जोडओळ) अवलंब केला आहे. पट्टा पध्दतीमध्ये पिकास भरपुर प्रमाणात सुर्यप्रकाश व हवा मिळते. त्यामुळे याच पट्टा पध्दतीचा अवलंब शेतकरी मित्रानो तुम्हाला करायचा आहे.
ही पद्धत वापरून त्यांनी मागील वर्षी एकरी ५१ क्विंटल कपासीचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्यांनी वेगवेगळ्या जमिनीसाठी वेगवेगळी पद्धत सांगितली आहे.या पद्धती तुमच्या असणाऱ्या जमिनीनुसान असणार आहेत.त्यांनी एकूण चार पद्धती सांगितल्या आहेत ज्या खालील प्रमाणे आहेत आणि त्या आता आपण सविस्तर पाने पाहणार आहोत.
जमीन
ओळीतील अंतर
झाडातील अंतर
एकरी झाडाची संख्या
एकरी उत्पन्न
भारी
5 x 5 x 7 x 1
1
7260
45 ते 50 क्विंटल
भारी
4 x 4 x 8 x 1
1
7260
35 ते 39 क्विंटल
माध्यम
4 x 4 x 6 x 1
1
8712
30 ते 35 क्विंटल
माध्यम
3 x 3 x 6 x 1
1
9680
22 ते 28 क्विंटल
5 x 5 x 7 x 1 अंतर लागवड पद्धत
हि लागवड पद्धत फक्त तुम्हाला भारी जमिनीतच वापरायची आहे.कारण हे अंतर खूप मोठं आहे आणि भारी जमिनीतच झाडाचा चांगला विकास होतो आणि योग्य व्यवस्थापन देखील करता येते.चला आता लागवड पद्धत समजून घेऊ या पद्धती मध्ये एक पट्टा ७ फुटाचा असतो तर त्यानंतरचा दुसरा व तिसरा पट्टा यातील अंतर ५ फुटाचे असते म्हणजेच इथे ५ फुटाची जोडओळ असते आणि त्यानंतर परत ७ फुटायचा पट्टा असते.
अशा प्रकारे संपूर्ण शेतात लागवड केली जाते.आता समजून घेऊया दोन झाडातील अंतर.अशी लागवड करत असताना दोन तासात अंतर जास्त असल्याने आता दोन झाडातील अंतर कमी करून जास्त झाडाची संख्या एकरी वाढविण्यासाठी दोन झाडातील अंतर फक्त १ फूट ठेवावे.यापेक्षा जास्त अंतर ठेऊ नये झाडाची संख्या कमी बसेल.
हे अंतर कसे आहे हे खालील आकृतीच्या माध्यमातून समजून घेऊ
4 x 4 x 8 x 1 अंतर लागवड पद्धत
हि लागवड पद्धत देखील तुम्हाला भारी जमिनीतच वापरायची आहे.तशी हि पद्धत तुम्हाला मध्यम जमिनीत देखील वापरता येते मात्र तुम्हाला पाण्याची आवशकता लागेल.या पद्धतीत ४ फुटाचे ठिबक चांगल्या प्रकारे काम करते.चला आता लागवड पद्धत समजून घेऊ. या पद्धती मध्ये एक पट्टा ८ फुटाचा असतो तर त्यानंतरचा दुसरा व तिसरा पट्टा यातील अंतर 4 फुटाचे असते म्हणजेच इथे 4 फुटाची जोडओळ असते आणि त्यानंतर परत ८ फुटायचा पट्टा असते.
दोन झाडातील अंतर कमी करून जास्त झाडाची संख्या एकरी वाढविण्यासाठी दोन झाडातील अंतर फक्त १ फूट ठेवावे.यापेक्षा जास्त अंतर ठेऊ नये झाडाची संख्या कमी बसेल.या पद्धतीमध्ये झाडाला चांगला सूर्यप्रकाश व हवा मिळते. या पद्धतीमध्ये कापसाची पातेगल होत नाही या पद्धतीमध्ये ७२६० झाडे बसतात.या लागवड पद्धतीत ३५ ते ४० क्विंटल पर्यंत उत्पन्न होते असे मत अमृतराव देशमुख यांचे मत आहे.
अंतर कसे कसे घ्यावे हे खालील आकृतीत दाखविले आहे.
4 x 4 x 6 x 1 अंतर लागवड पद्धत
हि लागवड पद्धत देखील तुम्हाला माध्यम जमिनीत वापरायची आहे.या पद्धतीत ४ फुटाचे ठिबक चांगल्या प्रकारे चालते.चला आता लागवड पद्धत समजून घेऊ. या पद्धती मध्ये पहिला पट्टा ६ फुटाचा असतो तर त्यानंतरचा दुसरा व तिसरा पट्टा यातील अंतर 4 फुटाचे असते म्हणजेच इथे 4 फुटाची जोडओळ असते आणि त्यानंतर परत 6 फुटायचा पट्टा असते.दोन झाडातील अंतर १ फूट ठेवायचे आहे
.हि पद्धत मध्यम जमिनीसाठी योग्य आहे भारी जमिनीमध्ये असे व्यवस्थापन करू नये.या देखील पद्धतीमध्ये कापसाची पातेगल होत नाही या पद्धतीमध्ये 8712 झाडे लागतात .या लागवड पद्धतीमध्ये ३0 ते 35 क्विंटल पर्यंत एकरी उत्पन्न होते घेता येते. खालील आकृती पाहून अंतर लक्षात घ्या.
3 x 3 x 6 x 1 अंतर लागवड पद्धत
हि लागवड पद्धत कोरडवाहू किंवा हलक्या जमिनीसाठी योग्य राहील.या पद्धतीमध्ये पहिया तासापासून दुसरे तास ६ फूट असते आणि त्या तासापासून तिसऱ्या तासाचे अंतर ३ चौथ्या तासाचे अंतर ३ फूट अशी जोडओळ असते जी खालची आकृतीमध्ये पाहायला मिळेल.दोन झाडातील अंतर हे एक फुटाचे ठिवावे.
या लागवड पद्धतीमध्ये ९६८० इतकी झाड बसतात. अमृतराव देशमुख यांच्या मते जर पारंपरिक पद्धतीत जर तुम्हाला ५ क्विंटल होत असेल त्यात दुपार वाढ होऊन १० क्विंटल होऊ शकते.बऱ्याच शेतकऱ्यांनी आता पर्यंत १५ ते २५ क्विंटल पर्यंत उत्पन्न घेतलेले आहेत.
अंतर कसे कसे घ्यावे हे खालील आकृतीत दाखविले आहे.
Amrut Pattern cottonलागवड करताना ह्या काही गोष्टी लक्षात घ्याव्या.
हि लागवड पद्धत काही विशेष गोष्टीवर काम करताना दिसते त्यामुळे आज तुम्हाला अमृत पॅटर्न नुसार शेती करायची असेल तर ह्या गोष्टीचे काटेकोर पाने पालन करा.जर तुम्ही यातील कोणतीही एक गोष्ट चुकविली तरी तुम्हाला उत्पन्नात वाढ होणार नाही हे लक्षत घ्यावे.
१) बियाणे लागवड करताना एका ठिकाणी फक्त एकाच बी लावावी. २) कापूस जमिनीच्या वर निघाल्यास लगेच चुका भरून घ्याव्या. ३) लागवड करताना सोबत खताचा वापर टाळावा. ४) जमिनीमध्ये ओलावा असतानाच शेणखत टाकावे. ५) झाडाचा शेंडा खुद्द नये.
अमृत पॅटर्न लागवडीचे फायदे
अमृत पॅटर्न पद्धत हि भारतातील सर्वात जास्त विक्रमी उत्पन्न देणारी लागवड पद्धत असून या योजनेचे फायदे खालील प्रमाणे आहेत.
१) एकरी झाडाची संख्या अधिक बसते. २) मोकळी जागा असल्याने फवारणी करण्यास खूप सोपे जाते. ३)सर्वात महत्वाची गोस्ट पतंगाला होत नाही.झाल्यास खूपच कमी प्रमाणात होते. ४) कापूस वेचायला सोपा जाते. ५) अंतर मशागतीसाठी सोपे जाते. ६) फवारणी करायला सोपे जाते व फवारणी चांगली होते. ७) तनव्यवस्थापन करायला सोपे जाते मजुरांचा खर्च कमी लागतो. ८) पाणी द्यायला सोपे जाते व पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत होते.
टीप-राहिलेली माहिती लवकरच अपडेट केली जाईल….धन्यवाद