Category Archives: योजना

yojna

fertilizer new rate 2023 | खताचे 2023 नवीन भाव -खताचे भाव झाले कमी,पहा सविस्तर माहिती.

fertilizer new rate 2023 :- आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी,यंदाची खरीप पेरणी हि खूप कमी खर्चात होणार आहे कारण आता खताच्या ( khatache bhav 2023) दारात मोठ्या प्रमाणावर घाट झाली आहे.चला तर शेतकरी मित्रानो पाहुयात कोणत्या खताचे भाव कमी झाले? कोणत्या खताचे भाव कायम आहेत? तसेच कोणत्या खताचे भाव कमी झाले नाही?

आजच्या बातमीपत्रामध्ये चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती तेव्हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा आणि लेख आवडल्यास लीके करायला विसरू नका तसेच whatsapp च्या माध्यमातून जास्तीत जास्त share करा.

fertilizer new rate 2023

हे पण वाचा-आताची मोठी बातमी-या पिकाच्या हमी भावात वाढ –पहा नवीन भाव

शेती करायची म्हटलं कि खत हि अतिशय महत्वाची बाब आहे आणि त्याशिवाय शेती करणे हे अशक्य आहे.आणि याच कारणाने शेतकऱ्याना खताचे दर ( fertilizer new rate 2023) काय आहेत हे समजून घेणे गरजेचं आहे अन्यथा शेतकर्याची फसवणूक होऊन त्यांच्याकडून अधिक पैसे उकळले जातात.

केंद्र सरकारच्या निर्णयाने शेतकरी सुखावला -fertilizer new rate 2023७ खताचे दर घटले.

२०२३ खताचे भाव:- प्रत्येक वर्षाला खत कंपन्या खातांच्या किमतीत वाढ करताना दिसत आहेत.मात्र या वर्षाला खताच्या दारात वाढ न होता घाट झाल्याने ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकरी आनंदी होणार आहे.कारण एकूण ७ खताच्या दारात मोठी घट झाली आहे. मागील वर्षी या खताचे नेमके दर काय होते या वर्षाला खातांचे दर काय राहणार?कोणती कंपनी आहे कोणतं खत आहे? हे एकूणच खालील रकान्यात दाखविले आहे.

अनुक्रमांक खताचे नाव २०२२ चे भाव २०२३ चे भाव वाढविवरण ( वाढ/घट )
113 35 14 15501400150 घट
2DAP-18 48 0013501200150 घट
3NPS-20 20 00 1312501050250 घट
4NPS- 16 20 00 13 11501000150 घट
5NPK-10 26 26 14701300170 घट
6NPS-28 28 0 01500145050 घट
7NPKS-15 15 15 914701150320 घट

खत भावशीर न मिळाल्यास शेतकऱ्यानी कुठं तक्रार करावी ?

शेतकरी मित्रानो ,तुम्ही जेव्हा खत,बी-बियाणे खरेदी करायला जाता तेव्हा मात्र तुमची बऱ्याच वेळ फसवणूक केली जाते.तुमच्याकडून जादा पैसे घेतले जातात अशावेळी नेमकं काय करावं ? तक्रार कशी करावी?तक्रार कुठे करावी? हे माहित नसते.शेतकरी मित्रानो जर तुमच्या सोबत अशा काही प्रकार घडला तर तुम्हाला त्यासाठी कृषी विभागात लेखी स्वरूपाची तक्रर करावी लागते.

तक्रार करत असताना तुम्ही विकत घेतलेल्या मालाचे वर्णन त्यात आपल्याला करायचे आहेत.कोणत्या कृषी केंद्रातून हि खात/बी-बियाणे विकत घेतली हे देखील तक्रारीत स्पस्ट लिहायचे आहे .संपूर्ण तक्रार लिहिणं झाली कि,तालुका कृषी विभागात तालुका कृषी अधिकाऱ्याला हि तक्रार द्यायची आहे.आणि अतिशय महत्वाची बाब म्हणजे त्या सोबत आपण माल खरेदी करताना घेतलेले बिल जोडायचे.

तक्रार करताना हे काम कारा नाहीतर मिळणार नाही मदत .

बऱ्याचं शेतकऱ्यानी अशा तक्रारी केल्या मात्र त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही.असे नेमकं का होते,हि मदत का मिळत नाही हे समजून घेऊ.सर्वात महत्वाचं शेतकऱ्याना नेमकी तक्रार कशी करावी हेच माहित नसते.आणि दुसरा मुद्दा असा कि बरेच शेतकरी खत किंवा बियाणे विकत घेताना पक्के बिल घेत नाहीत .दुकानदार देखील शेतकऱ्याना कचे बिल देतात आणि हे कचे बिल जर तक्रर करताना जोडले तर तुमाला कोणतीच मदत मिळत नाही. तेव्हा तक्रार करत असताना शेतकऱ्यानी नेहमी पक्के बिक जोडावे.

कापसाचे वाण निवडतांना ह्या 6 गोष्टी लक्षात घ्या | kapus | kabaddi cotton seeds

मार्च व एप्रील 2023 आतीवृष्टी नूकसान भरपाई चे पैसे आले | Ativrushti Nuksan Bharpai 2023 new update

Ativrushti Nuksan Bharpai 2023 new update | किती मदत मिळणार? पात्र जिल्हे कोणते?- चला पाहूया सविस्तर

Ativrushti Nuksan Bharpai 2023 new update

Ativrushti Nuksan Bharpai 2023 new update :- मित्रांनो मार्च, एप्रिल 2023 मध्ये अवेळी पाऊस किंवा गारपिटीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. जर तुमच्या पिकाचं खरोखरच नुकसान झालेला असेल तर लवकरच नुकसान भरपाईची रक्कम ( Ativrushti Nuksan Bharpai 2023 ) तुमच्या बँक खात्यावरती वितरित केले जाणार आहे. यासाठी भरपूर प्रमाणात निधी राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित झालेला आहे. मार्च-एप्रिलमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी निधी वितरित करण्याबाबत एक जीआर ( GR) देखील आलेला आहे या जीआरमध्ये राज्यातील 22 जिल्हे पात्र करण्यात आलेले आहेत.

अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२३ मदत २२० कोटी मदत GR इथे बघा

Ativrushti Nuksan Bharpai 2023 new update :- या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 222 कोटी निधी वितरित करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो कोणते 22 जिल्हे पात्र आहेत? यामध्ये तुमचा जिल्हा आहे का? असेल तर या एकूण 222 कोटी मधून तुमच्या जिल्ह्यासाठी किती निधी मिळणार आहे? आणि तो निधी वितरित करण्यासाठी जिल्ह्यात किती शेतकरी पात्र आहेत? याची सुद्धा माहिती या जीआर मध्ये दिलेले आहे.

हीच माहिती सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत.जर मार्च आणि एप्रिल 2023 मध्ये तुमच्या पिकाचे नुकसान झालेलं असेल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा जर आमच्या न्युज पोर्टल वर नवीन असाल आणि सर्व माहिती व योजना मोबाइलला वे मिळवायच्या असतील तर आमच्या न्युजला followo करा किंवा आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

काय आहे GR ? कोणाला मिळणार अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम ?

चला मित्रांनो, सविस्तर जीआर आपण पाहायला सुरुवात करूया. तर पाहू शकता मित्रांनो मार्च एप्रिल 2023 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीचे नुकसानासाठी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत दिनांक 5 जून 2023 रोजी हा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे.

आता या जीआरची प्रस्तावना आपण सर्वप्रथम पाहूयात मित्रांनो पाहू शकता अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावी याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान म्हणजेच इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते.

2023 सोयाबीनची सर्वात जास्त उत्पन्न देणारे टॉप 5 सुधारित वाण

राज्यात माहे मार्च एप्रिल 2023 या कालावधीत पडलेल्या अवेळी पावसामुळे मुख्यत्वे शेती पिकांचे नुकसान झालेले आहे. अवेळी पाऊस राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेतपिकांचे नुकसान 33% पेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झालेले आहेत तेवढ्या क्षेत्राकरिता दोन हेक्टर पर्यंत मर्यादित विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते.

तर मित्रांनो शासन निर्णय पहा म्हणजे तुम्हाला निधी किती मिळालेला आहे ही गोष्ट लक्षात येईल मित्रांनो पाहू शकता मार्च एप्रिल 2023 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून 222 कोटी 65 लाख 34 हजार इतका निधी सोबतच्या प्रपत्र दर्शवल्याप्रमाणे जिल्हा निहाय्य वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. तर मित्रांनो 222 कोटीचा निधी आहे तो निधी जिल्हानिहाय कशा पद्धतीने वितरित करण्यात आलेला आहे याच्याबद्दलचा एक प्रपत्र दाखवण्यात आलेला आहे आणि ते प्रपत्र सुद्धा आता आपण पाहणार आहोत.

महसूल विभाग निहाय जिल्ह्याची यादी जाहीर Ativrushti Nuksan Bharpai 2023 new update

नागपूर विभाग (एप्रिल 2023)

तर मित्रांनो पाहू शकता दिनांक 5 जून 2023 सोबतचे प्रपत्र तर मित्रांनो हे प्रपत्र तुम्ही पाहू शकता सर्वप्रथम इथे जिल्हा दिलेला आहे नागपूर नुकसानाचा कालावधी आहे, एप्रिल 2023. नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या आहे 403. 403 शेतकऱ्यांसाठी एकूण निधी 21 लाख 71 हजार एवढा आहे.. त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील एप्रिलमध्ये झालेल्या नुकसानासाठी 303 शेतकरी पात्र असणार आहेत आणि वर्धा जिल्ह्यासाठी एकूण 24 लाख 4 हजार एवढा निधी प्राप्त असणार आहे.

अ.
क्र.
जिल्हाकालावधी
शेतकरी संख्या
बाधित क्षेत्र
एकुण निध
(रु लाखात)
1नागपूर एप्रिल 2023403125.79 21.71 रु लाखात
2वर्धाएप्रिल 2023303 136.28 24.04
3भंडाराएप्रिल 20231612 557.59 95.15
4गोंदियाएप्रिल 2023442 172.07 30.93
5चंद्रपूर एप्रिल 2023 1418 1745.97 179.61
6गडचिरोलीएप्रिल 20232350 1137.86 193.86
एकूण6528 3875.56 545.30

त्यानंतर भंडारा जिल्हा आहे भंडारा जिल्ह्यामध्ये 1612 शेतकरी पात्र असणार आहेत या 1612 शेतकऱ्यांसाठी भंडारा जिल्ह्यामध्ये 95 लाख पंधरा हजार एवढा निधी वितरित केला जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यासाठी 442 शेतकरी पात्र आहेत. एकूण निधी 30 लाख 93 हजार एवढा आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 1418 शेतकरी पात्र आहेत चंद्रपूर जिल्ह्यासाठी एक कोटी 69 लाख 61 हजार एवढा निधी असणार आहे. त्यानंतर गडचिरोली जिल्हा आहे गडचिरोली जिल्ह्यातील 2350 शेतकरी पात्र असणार आहेत संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी एक कोटी 93 लाख 86 हजार एवढा निधी असणार आहे.

नागपूर विभाग (मार्च 2023)

एकूण नागपूर विभागातील एप्रिल महिन्यामध्ये नुकसान झालेले शेतकरी 6528 असणार आहेत आणि एप्रिल 2023 मध्ये नुकसान झालेला एकूण नागपूर विभागाचा निधी 5 कोटी 45 लाख 30 हजार एवढा असणार चाळीस लाख तीस हजार एवढा असणार आहे त्यानंतर मित्रांनो एकूण नागपूर विभागाचा मार्च 2023 मध्ये झालेल्या नुकसानाचा डाटाखाली दाखवलेला आहे

अ.
क्र.
जिल्हाकालावधी
शेतकरी संख्या
बाधित क्षेत्र
एकुण निध
(रु लाखात)
1नागपूर मार्च 20235540 4441.60 907.46
3भंडारामार्च 2023591 128.18 21.81
4गोंदियामार्च 2023457 150.50 25.40
5चंद्रपूर मार्च 2023 958 375.95 54.31
6गडचिरोलीमार्च 20232632 1257.28 178.05
एकूण10178 6353.51 1187.03

नाशिक विभाग (1 ते30 एनिल, 2023)

अ.
क्र.
जिल्हाकालावधी
शेतकरी संख्या
बाधित क्षेत्र
एकुण निध
(रु लाखात)
1नाशिक१ ते ३० एप्रिल 2023 82913 45293.72 8022.60
3धुळे१ ते ३० एप्रिल 2023 4879 2613.88 451.80
4नंदुरबार १ ते ३० एप्रिल 20231118 283.55 50.12
5जळगावं१ ते ३० एप्रिल 2023 19046 13384.99 2665.48
6अहमदनगर१ ते ३० एप्रिल 202347583 27078.39 4693.08
एकूण155539 88654.53 15883.08

अमरावती विभाग (17 ते30 एनिल,2023)

अ.
क्र.
जिल्हाकालावधी
शेतकरी संख्या
बाधित क्षेत्र
एकुण निध
(रु लाखात)
1अमरावती 17 ते30 एनिल,202310529 5847.16 1194.74
3अकोला 17 ते30 एनिल,202311186 5885.60 1026.33
4यवतमाळ 17 ते30 एनिल,202312530 5697.51 974.10
5बलुडाणा 17 ते30 एनिल,20237006 3532.21 620.37
6वानिम 17 ते30 एनिल,20235022 2973.59 514.97
एकूण46273 23936.07 4330.51

. त्यानंतर पुणे विभागांमध्ये सोलापूर जिल्हा आहे नाशिक विभागामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर आहे. अमरावती विभागांमध्ये, अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हे 22 जिल्हे पात्र असणार आहेत आणि या 22 जिल्ह्यांची लिस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हा जीआर मोबाईल मध्ये डाउनलोड करून घेऊन पाहू शकता तर या शासन निर्णयाची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मिळेल त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही हा शासन निर्णय डाऊनलोड करून घेऊ शकता आणि तुमच्या मोबाईल मध्ये सविस्तर माहिती तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने मार्च एप्रिल 2023 च्या अतिवृष्टी नुकसान भरपाई बाबतची थोडक्यात माहिती होती जी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या लेखाला लाईक करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका, धन्यवाद.

आताची मोठी बातमी-या पिकाच्या हमी भावात वाढ –पहा नवीन भाव | MSP Kharif 2023 | New Msp of kharif crop 2023-24

MSP Kharif 2023 :- नमस्कार शेतकरी मित्रानो, आमच्या कृषी न्युज २४ तास चॅनेलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईल वरती आपल्याला मिळत राहतील. मित्रांनो केंद्र सरकारने खरीप 2023 24 या हंगाम करिता किमान आधारभूत किंमत म्हणजेच हमीभाव 2023 वाढ केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षते खाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन आधारभूत किमतीवर निर्णय झालेला आहे.

मित्रांनो या लेखामध्ये आता सविस्तर माहिती पाहूयात. हमीभावात पीक निहाय किती वाढ झालेली आहे. मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने विपणन हंगाम २०२३-24 साठी सर्व अनिवार्य खरीप पिकांसाठी (New Msp of kharif crop 2023-24) किमान आधारभूत किमतीमध्ये म्हणजेच एमएसपी मध्ये वाढ करायला मंजुरी दिलेली आहे.

मंडळी माहितीसाठी हि खालची निळी लिंक क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇👇

कबड्डी वाण लावण्या अगोदर जाणून घ्या- खरचं हे दुप्पट उत्पन्न देणारे वाण आहे का?

उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी फायदेशीर भाव मिळावा हे सुनिश्चित करण्यासाठी आणि पीक विविधतेला प्रोत्साहन मिळावे यासाठी खालील तक्त्यामध्ये दिल्याप्रमाणे सरकारने विपणन हंगाम २०२३-24 साठी खरीप पिकाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ केलेली आहे. मित्रांनो आता या ठिकाणी विपणना हंगाम 2023 24 साठी सर्व खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत कशी असणार आहे ते या ठिकाणी खालील तक्त्यामध्ये या ठिकाणी आपण पाहूया. मित्रांनो या ठिकाणी आपण भाववाढी बाबतचा जो चार्ट पाहणार आहोत हा चार्ट तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये हवा असेल तर आपले whatsapp ग्रुपवरती वरती मी उपलब्ध करून दिलेला आहे. ग्रुप ची लिंक मी ब्लॉगवर लावली आहे.

पीक निहाय हमीभाव तक्ता | MSP Kharif list 2023

अ.क्र.पिकाच नाव2022 चा हमीभाव2023 चा हमीभावहमीभाव वाढ
1भात20402183143 रुपये
2धान प्रथम श्रेणी20602203143
3संकरित ज्वारी29703180210
4ज्वारी मालदांडी29903225235
5बाजरी23502500150
6नाचणी35783846268
7मका19622090128
8तुरी66007000400
9मूग77558558803
10उडीद66006950350
11भुईमूग58506377527
12सूर्यफूल बिया64006760360
13सोयाबीन पिवळे43004600300
14तिळा78308635805
15कारळे72877734447
16कापूस माध्यम धागा60806620540
17कापूस लांब धागा63807020640

कापसाचे सर्वात उत्कृष्ट टॉप 5 वाण- शेतकऱ्यांना मिळणार सर्वात जस्ट उत्पन्न

मित्रांनो या ठिकाणी वरील तक्त्यामध्ये जो भाव दिलेला आहे तो प्रतिक्विंटल करिता या ठिकाणी दिलेला आहे. दुसऱ्या रकान्यामध्ये या ठिकाणी पिकाच नाव दिलेल आहे. त्यानंतर तीसऱ्या रकान्यांमध्ये 2022 मध्ये असलेला हमीभाव दिलेला आहे त्यानंतर पुढच्या कॉलम मध्ये 2023 मध्ये त्याचा हमीभाव काय आहे हे दिलेलं आहे.तसेच मित्रांनो या पुढच्या कॉलम मध्ये 2023 करता हमीभावामध्ये किती वाढ करण्यात आलेली आहे.त्याबाबत माहिती दिलेली आहे तर आता एक एक करून या ठिकाणी पीक निहाय आपण माहिती पाहूया.

मित्रांनो धान म्हणजेच भात पिकाकरिता आता या ठिकाणी 2023 24 करिता 2183 रुपये इतका हमीभाव असणार आहे या ठिकाणी 143 रुपये इतकी वाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे.त्यानंतर धान प्रथम श्रेणीतील भात याकरिता 223 रुपये इतका हमीभाव असून 143 रुपये इतकी वाढ करण्यात आलेली आहे. त्यानंतर संकरित ज्वारीकरिता या ठिकाणी आता 3180 रुपये इतका हमीभाव असणारा असून 210 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे.

मान्सूनचा पाऊस कधी येणार -पंजाबराव डंख यांचा नवीन अंदाज

त्यानंतर ज्वारी मालदांडी याकरिता 325 रुपये इतका हमीभाव ( MSP Kharif 2023 ) असणारा असून 235 रुपये इतकी वाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे.त्यानंतर बाजरी करिता या ठिकाणी आता 2500 रुपये इतका हमीभाव असणार आहे 150 रुपयांनी या ठिकाणी वाढ ही करण्यात आलेली आहे. त्यानंतर नाचणीकरिता आता या ठिकाणी 3846 रुपये इतका हमीभाव असणार आहे 268 रुपये या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे.

मका या पिकाकरिता या ठिकाणी 290 इतका हमीभाव ( MSP Kharif 2023 ) असणार असून या ठिकाणी 128 रुपये इतकी वाढ करण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो तुरी करिता या ठिकाणी आता 7000 रुपये इतका हमीभाव असणार आहे. चारशे रुपये वाढ करण्यात आलेली आहे. त्यानंतर मूग या पिकाकरिता आता 858 रुपये इतका हमीभाव असणारा असून 803 रुपये मी या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे.

उडीद पिकाकरिता 6950 रुपये हमीभाव असणारा असून 350 रुपये वाढ केलेली आहे भुईमूग या पिकाकरिता आता या ठिकाणी सहा हजार 377 रुपये इतका हमीभाव असणार असून 527 रुपयांनी या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे. त्यानंतर सूर्यफूल बिया करिता या ठिकाणी 6760 रुपये हमीभाव असणार असून 360 रुपयांनी या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे.

त्यानंतर सोयाबीन पिवळे याकरिता 4600 इतका हमीभाव ( MSP Kharif for 2023 ) असणार असून तीनशे रुपये वाढ करण्यात आलेली आहे. त्यानंतर तिळाकरिता याठिकाणी आता 8635 रुपये इतका हमीभाव असणारा असून 805 रुपयांनी या ठिकाणी वाढ ही करण्यात आलेली आहे. कारळे या पिकाकरिता 7734 रुपये मी वाचणार असून 447 रुपये इतकी वाढ करण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो मध्यम भागाच्या कापसाकरिता या ठिकाणी आता 6,620 रुपये इतका हमीभाव असणार असून 540 रुपये इतकी वाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे.

त्यानंतर लांब धाग्याच्या कापसाकरिता आता या ठिकाणी 7000 20 रुपये इतका हमीभाव असणार आहे 640 रुपये इतकी वाढ ही करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आता केंद्रीय मंत्रिमंडळाने या ठिकाणी येत्या हंगामा करिता आधारभूत किमतीमध्ये म्हणजेच हमीभावांमध्ये वाढ करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे.

अखेर शासनाची मदत जाहीर | Ativrusti nuksan bharpai 2023 | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार

Ativrusti nuksan bharpai 2023 :- नमस्कार शेतकरी मित्रानो,शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे. ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना चारशे एक कोटी रुपयांच्या मदतीचा वितरण केलं जाणार आहे. मित्रांनो, सन २०२१-22 या कालावधीमध्ये गारपीट आणि अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे.परंतु या बाधित शेतकऱ्यांना अद्याप देखील मदतीचे वितरण करण्यात आले नव्हतं.

Ativrusti nuksan bharpai 2023

आताची मोठी बातमी- नमो शेतकरी योजनेला मंजुरी | या दिवशी खात्यात पैसे होणार जमा

या शेतकऱ्यांना मदत वितरण करण्याकरता 5 जून 2023 रोजी एका अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन मंजुरी देण्यात आलेले आहे.ज्याच्यामुळे आता शेतकऱ्यांना चारशे एक कोटी रुपयांची मदत वितरित केले जाणार आहे.यात कोणते जिल्हे असणार आहेत? कोणत्या शेतकऱ्याना हि मदत मिळणार आहे? या बाबतची संपूर्ण माहिती आज आपण या लेखात बघणार अहो, तेव्हा हा लेख संपूर्ण नक्की वाचा.

सन २०२१-22 या कालावधीमध्ये गारपिट व अवेळी पावसामुळे शेती पिकांचे, बहुवार्षिक पिकांचं नुकसान झालेलं होतं. याचबरोबर बऱ्याच साऱ्या घरांची पडझड झालेली होती. तसेच बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं किंवा बऱ्याचदा नागरिकांचा नुकसान झालेलं होतं,अशा नुकसानग्रस्त झालेल्या नागरिकांना मदत करण्याकरता 401 कोटी 70 लाख 70 हजार रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मदतीची रक्कम खातेदाराच्या बँक खात्यावरती थेट जमाकरण्यात येणार आहे .

विभागनिहाय अशी असणार वाटप होणारी निधी | Ativrusti nuksan bharpai

सध्या ४ महसूल विभागासाठी हे निधीचे वाटप केले जाणार असून या महसूल विभागातील बाधित सर्व जिल्हे व तालुक्यासाठी हा निधी लागू राहणार आहे.हा निधी लवकरच वाटप केला जाणार असल्याची माहिती मिळत असून शेतकऱ्याच्या /लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात हि रक्कम जमा केली जाणार आहे.

महसुल विभागनिहाय वितरित करण्यात आलेला निधी पुढीलप्रमाणे

अ.क्र.विभागमंजूर निधी
1अमरावती२४ कोटी ५७ लाख ९५ हजार
2नाशिक६३ कोटी ९ लाख ७७ हजार
3पुणे५ कोटी ३७ लाख ७० हजार
4छत्रपती संभाजी नगर८४ कोटी ७५ लाख १९ हजार

Ativrusti nuksan bharpai 2023 वाटतांना बँकांना शासनाचे निर्देश व निधी वाटपाचे वैशिट्य

बऱ्याच शेतकऱ्यानी शेतीसाठी किंवा व्यवसायासाठी विविध बँकाकडून कर्ज घेतलेले असते आणि अशा वेळी हे आर्थिक मदत शेतकऱयांच्या खात्यात जमा झाली कि बँका या मदतीच्या रकमेमधून कर्ज वसुली करून घेतात.अशावेळी शेतकऱ्याच्या हातात काहीच पडत नाही म्हणून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करूनये अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश सुद्धा या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेले आहेत.अशी वसुली केल्यास संबंधित बँकेवर कायदेशीर कार्यवाही केली जाण्याची मोठी शक्यता आहे.

इथे क्लिक करून नुकसान भरपाईचा शासन निर्णय बघा -हि आहे जिल्हा निहाय यादी

अतिवृष्टी झाल्या नंतर शेती बरोबर इतर लोकांचे देखील मोठा प्रमाणावर नुकसान झाले आहेत,मदतीसाठी लागू असलेले घटक खालील प्रमाणे आहेत

अ.क्र.लागू घटक
1शेतपिकाचे नुकसान
2घरगुती भांडी
3मृत जनावरानां मदत
4शेडच्या नुकसानीसाठी मदत
5पडझड झालेली कच्ची/ पक्की घर
6कारागीर / बारा बलुतेदार
7मत्स्य व्यवसाय नुकसानी करता अनुदान

Maha DBT Lottory २०२३ – महा DBT लॉटरी लागली लगेच कागदपत्र अपलोड करा.

कृषी यांत्रिकीकरण व इतर घटकांची लॉटरी लागली -पात्र लाभार्थाची यादी आली

Maha DBT Lottory २०२३ नमस्कार शेतकरी मित्रानो,तुम्हाला तर माहीतच आहे कि, महा डीबीटी पोर्टलच्या माह्यामातून अर्ज एक योजना अनेक हा कार्यक्रम राबविला जाते.शेतकरी मित्रानी विविध बाबीसाठी अर्ज केले होते आणि बरेच शेतकरी या अर्जाची सोडत कधी होते याची वाट पाहत होते.आता मात्र तुमच्यासाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे.ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या योजनांच्या लॉटरीच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आहे.

Maha DBT Lottory २०२३

कापसाचे हे अंतर सगळ्यात फायद्याचे-जमिनी निहाय अंतर पद्धती

मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी फार्मर्स स्कीमच्या माध्यमातून एकात्मिक कृषीयांतरीकरण,सिंचन साधने व सुविधा, बी बियाणे खते औषधे याचबरोबर अनुसूचित जाती जमातीसाठी विशेष घटक यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजना आणि याच्यासाठी अर्ज केलेले आणि पात्र झालेल्या शेतकऱ्यांची सोडत झालेली आहे, लॉटरी लागलेली आहे.

जे शेतकरी या Maha DBT Lottory २०२३ पात्र झालेले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना महा dbt सोडतीमध्ये नंबर लागलेला आहे. आपण लॉटरीमध्ये पात्र झालेला असाल तर त्यांनी लॉगिन केल्यानंतर त्यांना विनर असं दाखवला जात आहे .काही शेतकऱ्याना मोबाईलवर मेसेज देखील आला असेल.आता तुम्हाला आणि सात दिवसाच्या आतमध्ये कागदपत्र अपलोड करावे, अशा प्रकारचा अहवान कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

सोडतीत लागू असणाऱ्या योजना | Maha DBT Lottory scheme list २०२३

तशा तर अनेक योजना या पोर्टलच्या माध्यमातून राबविल्या जातात मात्र सध्या काही निवडकच योजनेची सोडत करण्यात अली आहे.सध्या सोडतीत बलागु असणाऱ्या योजनेची ची लिस्ट हि खालील प्रमाणे आहे.

अनुक्रमांकलागू योजना
1सिंचन साधने आणि सुविधां
2एकात्मिक फलफलोत्पादन
3बी-बियाणे /खते औषधे
4विशेष घटक

काय आहे पुढील प्रक्रियातुम्ही पात्र झाल्यास पुढे काय करायचं

महा dbt सोडतीत तुम्ही पात्र झाल्या तुम्हाला पुढे महत्वाचे काम करायचे आहे हे काम तुम्ही केले तरच तुम्हाला पात्र झालेल्या योजनेचा लाभ मिळतो अन्यथा तुम्हाला या योजनेपाससून अपात्र केलं जाते.तुमची कोणत्याही योजनेसाठी निवड झाल्यास तुम्हाला येता २ दिवसाच्या आत मेसेज येतो किंवा कृषी विभागाकडून तुम्हाला फोन येतो.त्यानंतर तुम्हाला तुमच्या योजनेच्या स्वरूपानुसार कागदपत्र अपलोड करायला सांगितले जातात.

हि कागदपत्र तुम्ही ७ दिवसाच्या आत सडत करावी लागतात .आपण हे कागदपत्र अपलोड न केल्यास तुम्ही निवड रद्द केली जाते.किंवा तुम्हाला आणखी काही दिवसाचा वेळ दिला जाऊ शकतो.तुम्ही संपूर्ण कागदपत्रे अपलोड केल्या नंतर पुढील ८ ते १० दिवसात तुमच्या कागदपत्राची पडताळणी केली जाते व संपूर्ण कागदपत्रे योग्य असल्यास तुम्हाला मंजुर झालेल्या साधन घेण्यास पूर्व संमती दिली जाते.

हि पूर्व संमती मिळण्या अगोदर तुम्ही ते साधन खरेदी करू शकत नाही आणि असे केल्यास तुम्हाला या योजनेचं अनुदान मिळत नाही, हे सर्व शेतकऱ्यानी लक्षात घ्यावे.आता साधन खरेदी केल्या नंतर तुम्हाला त्याची बिल हि dbt पोर्टलवर अपलोड करावी लागतात आणि त्या नंतर तुमच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाते.

लॉटरी लागली कि महा DBT पोर्टल वर कोणती कागदपत्र अपलोड करावी लागतात

Maha DBT Lottory योजनेसाठी लागू आलेल्या संपूर्ण कागदपत्राची यादी खालील प्रमाणे आहे.

१ ) आधार कार्ड
२ ) शेतकऱ्याचा ७/१२ व ८ अ
३ ) बँक खाते
४ ) उत्पनाचा दाखला
५ ) शेताचा नकाशा
६ ) राखीव प्रवर्ग असल्यास जातीचे प्रमाणपत्र
७) रहिवाशी दाखला
८ ) महिला असल्यास २ नावाची व्यक्ती एक असल्याचे प्रमाणपत्र
९ ) साधनाचे कोटेशन