crop insurance new GR 2023 शासन निर्णय ( GR )आला-योजनेला मिळाला हिरवा झेंडा
crop insurance new GR :-शेतकरी मित्रानो तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी बातमी.प्रधान मंत्री पीक विमा योजना 2023 अंतर्गत आता फक्त 1 रुपयांमध्ये पिक विमा हा शेतकऱ्यांना मिळणार आहे. या अगोदर आपण या संबंधित उपडेट दिली होती कि हि योजना लवकरच लागू होणार आहे.आता त्याच्या संदर्भात 23 जून 2023 चा crop insurance new GR हा ( शासन निर्णय) काढण्यात आलेला आहे.
शेतकरी मित्रानो, सर्वसामावेशक पिक विमा योजना ही राबवण्यास आता मंजुरी मिळालेली आहे.आता शेतकऱ्यांना 1 रुपयांमध्ये आपल्या पिकाचा विमा हा मिळणार आहे.
मागे झालेल्या अर्थसंकल्पामध्ये फक्त १ रु. पीक विमा या योजनेची घोषणा करण्यात आली होती.मात्र त्याबाबत मागील काही दिवसापासून या निर्णयाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते.आता मात्र योजनेला हिरवा झेंडा दाखवत त्या संदर्भात हा शासन निर्णय प्रसारित करण्यात आला आहे. काय आहे शासन निर्णय? कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र राहणार आहेत? आणि कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार चला तर हे पाहुयात सविस्तर.
२०२३-24 चा अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पिक विमा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.हि Pik Vima Yojana 2023-२४ पासून राबवण्यास येण्यात असून आता या योजनेला मान्यता देण्यात अली आहे .
तुम्ही हा निर्णय बघू शकता, ज्यामध्ये खरीप व रब्बी हंगामी करिता राबवण्यास येणाऱ्या पीक विमा योजनेसाठी मान्यता देण्यात आलेली आहे. तर हि योजना दोन्ही हंगाम म्हणजेच खरीप व रब्बी साठी लागू राहील.
पूर्वी शेतकरी मोठ्या प्रमाणावर पिकविम्याकडे पाठ फिरवत होते कारण पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्याकडे पैसे राहत नव्हते.आणि लाभार्थी हिंसा भरणे अनिवार्य असल्यामुळे शेतकऱ्यांचा विमा काढला जात नव्हता.
आता मात्र हि काळजी मिटली असून फक्त शेतकऱ्यांना पिकविम्यासाठी सहभाग नोंदवायचा आहे.आणि फक्त २ रुपयात पीकविमा सहभाग असणार आहे त्यामुळे आता प्रत्येक शेतकरी आपल्या प्रत्येक पिकाचा विमा काढून आपल्या पिकाला संरक्षण देऊ शकतो.त्यामुळे हा शेतकऱ्यांसाठी सरकारचा योग्य निर्णय आहे.
काय आहेत कापूस बाजार भाव आजचे | काय आहेत cotton rate today ?
शेतकरी मित्रानो,सध्या शेतकरी फारच चिंतेत पडला आहे. कारण cotton rate today पहिला तर ६८०० रुपये क्विंटल ते ७०५० रुपये क्विंटल जात आहे.कापसाचे भाव वाढतील म्हणून मागील बऱ्याच दिवसापासून शेतकरी वाट पाहत आहेत.मात्र kapus bhav वाढण्याचे चिन्ह काही दिसत नाही.
त्यामुळे बरेच शेतकरी यांनी कापूस विक्रीस काढला.शेतकऱ्यांना चांगला cotton price लागेल अशी अपेक्षा आहे,कापसाच्या भावात वाढ होईल का? शेतकऱ्यांनो kapus bhav today काय? या सर्व प्रश्नाचे उत्तर देणार आहोत. शेतकरी बांधवांनो आता या पुढे cotton price today तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत.
तेव्हा नक्कीच रोजच्या रोज आमच्या न्यु पोर्टलला भेट द्यायला विसरू नका.चला तर शेतकरी मित्रानो आज कोणत्या बाजार समितीमध्ये cotton price today वाढले आहेत? कोणत्या बाजार समितीमध्ये cotton rate कमी झाले ? चला तर पाहूया सविस्तर माहिती.
कापसाचे विविध जिल्ह्याचे बाजार भाव खालील प्रमाणे दिले आहेत.ज्यामध्ये तुम्ही कापसाचे किमान भाव कापसाचे कमाल भाव पाहणार आहोत त्याच बरोबर कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाची किती अवाक झाली ते देखील पाहणार आहोत.
शेतमाल : कापूस
अ.क्र.
बाजार समिती
परिमाण
आवक
कमीत कमी दर
जास्तीत जास्त दर
सर्वसाधारण दर
23/06/2023
1
वर्धा
क्विंटल
345
5930
7200
6850
2
हिंगणघाट
क्विंटल
2500
6500
7110
6800
3
सिंदी(सेलू)
क्विंटल
625
7050
7225
7175
4
काटोल
क्विंटल
90
6800
7050
6900
5
सावनेर
क्विंटल
1200
6900
6900
6900
6
यावल
क्विंटल
25
5930
6850
6510
कापसाचे संपूर्ण बाजार भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
Milk rate today :- राज्यातील बहुतांश शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय निवडतात.पूर्वी त्यातून शेतकाऱ्यांना मोठा पैसा देखील मिळत होता मात्र आता पशु खाद्य व वैरणीचे दार मोठ्या प्रमाणावर वाढले मात्र दुधाचे दार अजून स्थिर आहेत.यामुळे शेतकऱ्यांना काढलेला खर्च पाहता दूध व्यवसाय परवडत नाही.
दूध खरेदीचा विचार केला तर राज्यातील खासगी कंपन्या तसेच सहकारी दूध संघ हे शेतकऱ्याकडून फक्त ३० रुपये दराने खरेदी करतात.आता मात्र या खरेदीच्या दारात वाढ करून किमान ३५ रुपये लिटर दराने खरेदी करावी यासाठी सरकार आता काम करणार आहे.
दूध खरेदीचा विचार केला तर राज्यातील खासगी कंपन्या तसेच सहकारी दूध संघ हे शेतकऱ्याकडून फक्त ३० रुपये दराने खरेदी करतात.आता मात्र या खरेदीच्या दारात वाढ करून किमान ३५ रुपये लिटर दराने खरेदी करावी यासाठी सरकार आता प्रयत्न करणार आहे,अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री रामकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
पुण्यात घेण्यात आलेल्या दुग्ध संस्थेच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला निर्णय पत्रकार परिषदेत सांगितला.दूध उत्पादक शेतकऱयांकडून बऱ्याच दिवसापासून दार वाढीची मागणी करण्यात येत होती.करम मधल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर दुधाच्या दारात घाट झाल्याने शेतकऱ्यांनी हि मागणी केल्याचं सांगितलं.
कोणताही व्यवसाय करण्यामागे २ पैशाचा वाढीव नफ्याची अपेक्षा असते तेव्हा दूध संघाच्या नफ्यासोबत शेतकऱ्यांचा नफा देखील लक्षात यावा याकरिता दुधाचे दर वाढीचा सरकार पाठपुरावा करेल असे यावेळी विखे पाटील यांनी सांगितले.आता लवकरच दूध लवकरच ३५ रुपये लिटरने विक्री होण्यासाठी सरकारची ठाम भूमिका ठरणार आहे.
महाराष्ट्रातील दुध उत्पादन: वर्तमान स्थिती काय आणि आजचे दुधाचे दर | Milk rate
दुध उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र भारतात प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्राच्या 2019-20 वर्षाच्या तुलनेत 2020-21 वर्षांमध्ये दुध उत्पादन अधिक वाढले आहे. पुण्या पेक्षा नाशिक, औरंगाबाद या विभागात दुध उत्पादन कमी आहे.
महाराष्ट्रातील सहकारी आणि सरकारी दुध उत्पादकांच्या दैनंदिन दुध प्रमाण कमी होत आहेत. 2020-21 वर्षातील एकूण दुध उत्पादन महाराष्ट्रात 137.03 लाख मेट्रिक टन एव्हढे उत्पादन घेतेले,तर 2019-20 वर्षांमध्ये 120.24 लाख मेट्रिक टन दुध उत्पन्न झाले होते.आर्थिक सर्वेक्षण 2022-२३ च्या अहवालानुसार हि माहित समोर आली आहे.
अहवालाच्या माहिती प्रमाणे महाराष्ट्राने आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेशप्रमाणे अधिक दुध उत्पादन केले आहे. अशाप्रमाणे, 2020-21 सालात पुण्याने 62.41 लाख मेट्रिक टन दुध उत्पन्न केला.
नाशिकाने 36.68 लाख मेट्रिक टन आणि औरंगाबादाने 20.86 लाख मेट्रिक टन दुध उत्पन्न केला. अमरावतीने 6.51 लाख मेट्रिक टन, नागपुराने 5.93 लाख मेट्रिक टन आणि कोकणाने 4.64 लाख मेट्रिक टन दुध उत्पन्न केला.”
UREA DAP Fertilizer Rate :- शेतकऱ्यांनो सावधान ८ जिल्ह्यात युरिया व डीएपी चा साठा कमी –Urea,DAP चे भाव वाढणार का?खतसाठा उपलब्द होणार का? खताचे भाव वाढणार का?कोणत्या जिल्ह्यात हा साठा कमी आहे.या सर्व प्रश्नच उत्तर तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
दरवर्षी खरिपाच्या पहिले खत साठा उपलब्ध करून दिला जातो.२०२३ साठी मोठ्या प्रमाणावर खत साठा उपलब्ध करून दिल्याच सांगितल्या गेलं होत.मात्र सध्या ८ जिल्ह्यात खताचा साठा कमी असल्याचा प्रकार उघड झाला आहे.खरीप पेरण्या लांबल्या मात्र काही भागात धूळ पेरण्या आटोपल्या आहेत.१५ ते २० % धूळ पेरण्या झाल्याचा अंदाज आहे.
पाऊस वेळेत झाला नाही किंवा पाहिजे तसा झाला नाही तर मात्र शेतकऱ्यावर दुबार पेरणीच संकट येऊ शकते.दुबार पेरणीची वेळ आल्यास आणखी खताची गरज शेतकऱ्यांना भासणार असताना पहिलेच खत साठा कमी आहे. खरं पाहिलं तर खत साठा कंपन्यांकडे नाही असं नाही मात्र मॉन्सून लांबल्याने बऱ्याच खत कंपन्यांकडून खताची मागणी न केल्याचा प्रकार उघड झाला आहे.राज्यातील ८ जिल्ह्यामध्ये UREA तर ४ जिल्ह्यामध्ये DAP साठा कमी आहे.या १२ जिल्यातून खताची मागणी सध्या कमी आहे.
हवामान विभागाने हवामान अंदाज व्यक्त केला आहे. यांचा अंदाज देखील आला आहे.त्यांच्यामते २३ ते ३० तारखे पर्यंत राज्यातील बऱ्याच भगत जोरदार पावसाळा सुरुवात होणार आहे. पाऊस पुरेशा झाल्यानंतर पेरणीला सुरुवात होईल व खताचा तुटवडा निर्माण होईल.शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नाही त्यांच्यावर तशी वेळ येऊ नाही यासाठी कृषी संचालक विकास पाटील यांनी खत साठा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देखील दिले आहे.
खरिपाचे योग्य नियोजन लावण्यासाठी उन्हाळ्यातच जिल्हातरावरून कृषी विभागाकडे खताची मागणी नोंदविली जाते.त्यांच्या मागणी प्रमाणे खताचा पुरवठा करण्यात येतो.काही शेतकऱ्यानी बियाणं व खत खरेदी केले आहे.मात्र बरेच शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत असून अजून पर्यंत त्यांनी हि खरेदी केली नाही.
DAP
खताची मागणी नसल्या कारणाने कंपन्यांनी देखील अजून पर्यंत खत मागणी केले नाही.दमदार पावसाने हजेरी लावली तर अचानक खरेदी वाढेल व शेतकरी अडचणीत येणार अशी मोठी संभावना आहे.
खालील या जिल्ह्यात UREA DAP Fertilizer Rate खतसाठा आहे कमी.
या जिल्ह्यात खत साठा कमी असून अजून पर्यंत मागणी कमी प्रमाणात आहे.
पशुखाद्य व वैरण योजना –शेतकऱ्यांना मिळणार 60 हजार रू. अनुदान
शेतकरी मित्रांनो,तुम्ही जर दूध उत्पादक शेतकरी असाल तर मात्र आता तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. Pashu khady vairan yojna जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम राबविण्यात प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे.
या बाबतचा शासनाकडून GR देखील प्रकाशित करण्यात आलेला आहे. ही योजना कशी असणार आहे? नेमका कोणाला लाभ मिळणार? तर पाहूयात याबाबत सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी लेख संपूर्ण वाचा.
दिनांक 21 जून 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने हा हा शासन निर्णय प्रकाशित केलेला आहे.आणि या GR च्या माध्यमातून जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम राबविण्यात प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.आता जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रमांतर्गत खालील नमूद विविध सहा उपघटकांचा समावेशकरण्यात आलेला आहे.
हि योजना सन २०२३-24 पासून राज्यात राबविण्यात शासनाची प्रशासकीय मान्यता देण्यात येत आलेली आहे. खालील सहा उपघटकांचा एकेक करून या ठिकाणी आपण माहित पाहणार आहोत. शेतकऱ्यांच्या शेतावर वेरण उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी वैरण बियाणे वाटप करण्याचा सरकारचा उद्देश आहे.शेतकरी मित्रानो जर तुम्हाला या योजनेचा लाभ घायचा असेल तर लाभार्थीकडे वरण उत्पादनासाठी स्वतःची शेतजमीन व सिंचनाची सुविधा असणे आवश्यक असणार आहे
अशाप्रकारे शेतकर्याना सुधारित बहुवर्षीय गवत प्रजातीचे ठोंबरे वाटप केले जाणार आहेत.या योजनेअंतर्गत या ठिकाणी उल्लेख केलेले वैरण्य तसेच संदर्भातले बियाणे या ठिकाणी शेतकऱ्यांना वाटप केले जाणार आहेत. शेतकरी मित्रानो ज्या लाभार्थीकडे स्वतःची पाकीट कमी तीन ते चार जनावरे आहेत अशा लाभार्थींना या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येणार आहे.प्रत्येक लाभार्थीला एक एकरच्या क्षेत्रात चारा पीक उत्पादन घेण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर 1500 रुपये च्या मर्यादेत वैरणीच्या बियाण्यांचा किंवा ठोंब्याचा पुरवठा करण्यात येणार आहे.
हि वैरणीची नेमकी कुठून मिळणार :- वेरणीची बियाणे व ठोंब्याची खरेदी राष्ट्रीय बियाणे महामंडळ राज्य बियाणे महामंडळ महाबीज किंवा इतर शासकीय संस्था किंवा कृषी विद्यापीठे,महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ महाराष्ट्र किंवा पशुधन विकास मंडळांतर्गत ची प्रक्षेत्रे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळा अंतर्गत ची प्रक्षेत्रे यांच्याकडून करण्यात यांच्या माध्यमातून उपलध करण्यात येणार आहेत.
संकरित किंवा देशी गोवंशीच्या कालवडी तसेच सुधारित देशी पारड्याची जोपासना करण्यासाठी अर्थसाह्य
पशुपालकांकडील संकरित / देशी कालवडी व सुधारित / देशी म्हशीच्या पारडया शास्त्रोक्त पध्दतीने जोपसण्यासाठी त्यांना सकस खाद्य देऊन तसेच, पशुपालकांना प्रशिक्षित करुन अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित गायी व सुधारित म्हशींची निर्मिती करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
सदर योजनेमध्ये पशुखाद्याच्या स्वरुपात अल्प भूधारक, अत्यल्प भूधारक व भूमिहीन शेतमजूरांस ५० टक्के अनुदानावर पशुखाद्य पुरवठा करणे व पशुपालकांकडील संकरीत / देशी कालवडी / सुधारीत / देशी पारड्यांचा विमा उतरविणे या सर्व गोष्टीवर भर देण्यात येणार आहे.
Pashu khady vairan yojna :- शेतकरी मित्रानो लाभार्थीकडील संकरित / देशी असलेल्या कालवडीस तिच्या वयाच्या ४ थ्या महिन्यापासून ३२ महिन्यांपर्यंत खाद्य पुरविले जाणार आहे .त्यासोबतच सुधारित / देशी पारडीला वयाच्या ४ थ्या महिन्यापासून ते ४० महिन्यांपर्यंत ५० टक्के अनुदानावर पशुखाद्य पुरविण्यात पुरविण्यात येण्याची तरतूद करण्यात अली आहे.
हा खाद्य पुरवठा प्रत्येक महिन्याला देण्यात येणार नाही. खाद्य देणे सुरू केलेल्या तारखेपासून दर तीन महिन्याने खाद्य पुरवठा करण्यात येणार आहे. खालील तक्त्या प्रमाणे खाद्य पुरवठा करणे बंधन कारक असणार आहे.
Pashu khady vairan yojna :-शेतकरी मित्रांनो,बऱ्यापैकी शेतकरी घरच्या घरी मुरघास तयार करतात.मात्र ती साठवण करण्यासाठी शेतकऱ्याकडे बॅग उपलब्ध नसतात आता मात्र शेतकर्याची काळजी मिटली आहे. आता सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून मुरघास तयार केल्यानंतर त्याची साठवणूक करणाऱ्या बॅक खरेदी वर या 50% अनुदान या ठिकाणी दिले जाणार आहे.
Animal feed:-मित्रांनो या ठिकाणी मुरघास निर्मितीसाठी एकूण दहा पॉलिथिन बॅक खरेदी करतात प्रति पशुपालक 50 टक्के अनुदान याप्रमाणे रुपये 3000 रुपये या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.त्यामुळे हि शेतकऱ्यासाठी चांगली गोस्ट आहे.
त्यामुळे हि शेतकऱ्यासाठी चांगली गोस्ट आहे.आणि मुरघास साठवणूक करण्यासाठी आता शेतकऱ्यांना खूप सोयीचे जाणार आहे.तेव्हा शेतकरी मित्रानो तुम्ही या योजनांचा लाभ घेऊ शकता.
मुरघास वापरासाठी कमाल दोन दुधाळ पशुधनासाठी 33% अनुदान | शेतकऱ्यांना मिळणार 60 हजार रू. अनुदान
Pashu khady vairan yojna :- शेतकरी मित्रांनो चौथा उपघटक खूप खास आहे कारण अगोदरच्या काही घटकामध्ये इतर गोष्टी मिळणार आहेत मात्र चौत्या उपघटक नुसार मुरघास वापरासाठी कमाल दोन दुधाळ पशुधनासाठी 33% अनुदान या ठिकाणी मित्रांनो दिल्या जाणार आहे त्यामुळे हि शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी म्हणता येईल.
मुरघास खरेदी करिता कमाल दोन दुधाळ पशुधनासाठी 33% अनुदान रुपये 7300 प्रति पशुपालक प्रति वर्ष इतके अनुदान या उपघटकांतर्गत दिले जाणार आहे.सोबतच मित्रांनो या ठिकाणी पाचवा उपघटकामधे टी एम आर टोटल मिक्स रेशन वापरासाठी दोन दुधाळ पशुधनासाठी प्रोत्साहन पर 33% अनुदान या ठिकाणी शेतकर्याना दिले जर आहे.
मित्रांनो टी एम आर खरेदी करिता कमल दोन दुधाळ पशुधनासाठी 33% अनुदान म्हणजेच या ठिकाणी 60 हजार रुपये प्रति पशु पालक प्रति वर्ष इतके या ठिकाणी दिले जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो सहावा उपघटक आहे खनिज मिश्रण वापरासाठी कमाल दोन दुधाळ पशुधनासाठी 33% अनुदान मित्रांनो या ठिकाणी खनिज मिश्रण खरेदी करिता कमल दोन दुधाळ पशुधनासाठी 33% अनुदान रुपये 600 रुपये प्रति दुधाळ पशुधन प्रतिवर्ष अनुदान दिले जाणार आहेत.